Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअरटेलचे २ नवे स्मार्टफोन्स

Webdunia
एअरटेलनेही ग्राहकांसाठी २००० हून कमी किंमतीत २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये A1 Indian आणि A41 Power यांचा समावेश आहे. एअरटेलने A1 Indian या स्मार्टफोनची किंमत १७९९ रुपये ठेवली आहे. तर, A41 Power या फोनची किंमत १८४९ रुपये आहे.
 
दोन्ही स्मार्टफोन्सची स्क्रिन ४ इंचाची आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये ड्युअल सिम, ड्युअल कॅमेऱ्याची सुविधा देण्यात आली आहे. फोनमध्ये १ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. खास बाब म्हणजे दोन्ही फोन्स हे गुगल सर्टिफाईड फोन आहेत. फोनमध्ये अँड्रॉईडचं लेटेस्ट ७.० नॉट ऑपरेटींग सिस्टम असणार आहे. तसेच हे दोन्ही फोन्स एअरटेलच्या १६९ रुपयांच्या मासिक प्लानसोबत ग्राहकांना मिळणार आहेत.
 
A1 Indian फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ३२९९ रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागणार आहे. तर, A41 Power फोन खरेदी करण्यासाठी ३३४९ रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागणार आहे. हे दोन्ही फोन्स एअरटेलच्या सिमकार्डसोबत मिळतील. ग्राहकांना पूढील महिन्यात ३६ महिन्यांपर्यंत १६९ किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचं रिचार्ज महिन्याला करावं लागणार. असं केल्यास एअरटेल ग्राहकांना १८ महिन्यांनंतर ५०० रुपये आणि ३६ महिन्यांनंतर १००० रुपयांचं कॅशबॅक मिळेल. अशा प्रकारे ग्राहकांना १५०० रुपयांचं कॅशबॅक मिळेल आणि त्यामुळे दोन हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत हे स्मार्टफोन्स ग्राहकांना मिळतील.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments