Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR

Webdunia
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (15:46 IST)
खेड तालुक्यातील चाकणमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाकडे तब्बल 15 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी माजी उपसरपंच,पत्रकार यांच्यासह 9 जणांविरोधात पुणे ग्रामीणच्या (Pune Crime) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी याप्रकरणात पत्रकारासह (Journalist Arrest) त्याच्या साथिदाराला अटक केली आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत सावतामाळी चौकातील नगरसेवकांच्या कार्यालयात घडला.हा प्रकार समोर येताच चाकणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
माजी उपसरपंच प्रितम शंकरसिंग परदेशी,संगिता वानखेडे,कांतीलाल सावता शिंदे गितांजली भस्मे ,कल्पेश अनंतराव भोई (वय-49), मंदा जोगदंड ,कुणाल राऊत  (सर्व रा. चाकण),संगिता नाईकरे (रा. तनिष सोसायटी फ्लॅट नं. सी 901 दिघी), प्रणित (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 41 वर्षीय नगरसेवकांनी सोमवारी (दि.13) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी पत्रकार कल्पेश अनंतराव भोई आणि कुणाल राऊत यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. फिर्यादी हे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. सध्या ते नगरसेवक नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपला असल्याची माहिती तपास अधिकारी विजय जगदाळे  यांनी दिली.
 
नगरसेवकांनी चाकण पोलीस ठाण्यात (दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्याच आलेल्या आरोपींनी व इतर सक्रीय टोळीने संगनमत करुन बदनामी करण्याच्या उद्देशाने एका महिलेला चाकण पोलीस ठाण्यात वारंवार पाठवून नगरसेवक यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते.
 
टोळीकडून 15 लाखाची खंडणीची मागणी
दरम्यानच्या काळात हे प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल  करुन सुरुवातीला 15 लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोड करुन 12 लाख किंवा 5 लाख रुपये व तक्रारदार महिलेच्या उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली.पैशाची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक यांच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.तसेच पैशांची मागणीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग देखील समोर आले आहे.नगरसेवकांनी सीसीटीव्ही व व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.
 
दरम्यान हा प्रकार समोर येताच चाकणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड (API Prakash Rathod) आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत होते. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments