Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune Ahmednagar Highway Accident : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (10:22 IST)
पुणे अहमदनगर महामार्गावर  भीषण अपघात घडला आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉंग साईडने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची धडक झाली आणि गाडीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. रांजणगाव एमआयडिसीतील LG कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. मयत सर्व पनवेलला जाण्यासाठी निघाले होते.
 
पुणे अहमदनगर महामार्गावरील रांजणगाव एमआयडीसी परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने भरधाव वेगातील कारला समोरासमोर धडक दिल्याने कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
 
संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), विशाल संजय म्हस्के (वय 16), राजू राम मस्के आणि हर्षदा राम मस्के (वय 4) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर साधना राम मस्के (वय 35) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण शेवगाव तालुक्यातील आवने बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. सर्वजण पनवेलच्या दिशेने निघाले होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मस्के कुटुंबीय पुणे अहमदनगर महामार्गाने संजय मस्के हे इको कार चालवत होते. दरम्यान रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनी समोर चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर कंटेनर चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला.
 
दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या मस्के कुटुंब यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी पैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

सीरियातील अलेप्पोमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पुढील लेख
Show comments