Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात 3,451 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज ; 2,451 नवीन रुग्णांची नोंद

Discharge of 3
Webdunia
शनिवार, 8 मे 2021 (08:30 IST)
पुणे शहरामध्ये शुक्रवारी  कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 451 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 451 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 
पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 702 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 64 रुग्ण शहरातील आहेत तर 21 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान, आज 3 हजार 491 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 95 हजार 976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी शहरातील विविध केंद्रावर 16 हजार 763 स्वॅब तपासणी करण्यात आली.
 
शहरात सक्रिय रुग्ण संख्या 38 हजार 481 इतकी आहे. यापैकी 1411रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 
पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संक्रमित रुग्ण बरे होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: दादर येथे तरुणीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

मुंबई: दादर येथे बी.कॉम.च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वडिलांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी आज

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

वक्फ दुरुस्ती विधेयकावर महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा सतर्क

पुढील लेख
Show comments