Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुकाराम सुपेंच्या घरात सापडलं सोनं, लाखांची एफडी , कोट्यावधीं रुपयांचं घबाड

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (12:15 IST)
राज्यात आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील रिक्त परीक्षा पेपर फुटीमुळे स्थगित करण्यात आली असून  पुणे सायबर पोलीस सेल ने राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात अडकलेल्या राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या असून सुपेंच्या घराची झडती घेतल्यावर त्यांच्या घरात पैसे, एफडी ,सोनं आणि कोट्यावधीं रुपयांच घबाड सापडलं आहेत .
म्हाडा  परीक्षा जी.ए सॉफ्टवेअर कडून घेण्यात आली  होती . आणि टीईटी परीक्षा देखील याच कंपनीकडून घेतली होती . टीईटी परीक्षेत कंपनीचे मालक डॉ .प्रितेश देशमुख यांनी दोन एजेंटसह राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि सल्लागार पदी असलेले अभिषेक सावरीकर यांनी उमेदवारांकडून लाच घेऊन पास केले.  
पोलिसांनी सुपे यांची कसून चौकशी करताना त्यांनी आपला गुन्हा कबूल केला .सुपे यांनी उमेदवारांकडून तब्बल 1.70 कोटी रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे.  पोलिसांनी या प्रकरणी सुपेंच्या घराची झडती घेतल्यावर त्यांना 5 ग्राम सोन्याची नाणे  पाचलाख पन्नास हजाराची एफ डीची कागदपत्रे , आणि 88 लाख 49 हजार 980 रोख रक्कम असं कोट्यावधीं रुपयांच घबाड सापडले आहे. 
 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments