Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पक्षाचे चिन्ह असते तर राहुल कलाटे 100 टक्के आमदार असते – संजय राऊत

Webdunia
मंगळवार, 13 जुलै 2021 (08:20 IST)
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून राहुल कलाटे अपक्ष लढले.त्यांना सव्वा लाख मते पडली. युती असल्याने त्यांना शिवसेनेचे चिन्ह देता आले नाही. चिन्ह न घेता कलाटे यांनी सव्वा लाख मते घेतली. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असते.तर, कलाटे 100 टक्के आमदार असते, असे भाष्य शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. युतीमुळे कलाटे यांना चिन्ह देता आले नसल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखविले.
 
चिंचवड मतदारसंघातून राहुल कलाटे अपक्ष लढले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिला होता. परंतु,या दोनही पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी कलाटे यांना मनापासून साथ दिली नसल्याचे मतदानातून दिसून आले. शिवसेनेच्या नेत्यांनीही युतीचे कारण देत भाजपचे लक्ष्मण जगताप यांचा प्रचार केला. असे असताना कलाटे यांनी कडवी झुंज देत सव्वा लाख मते घेतली. लक्ष्मण जगताप यांचा अवघ्या 40 हजार मतांनी विजय झाला. कलाटे यांचा थोड्या मताने पराभव झाल्याने आणि त्यांना शिवसेनेचे चिन्ह देता न आल्याचे शल्य खासदार राऊत यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात बोलून दाखविले.
 
खासदार राऊत म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे उभे राहिले. त्यांना सव्वा लाख मते पडली. चिन्ह न घेता कलाटे यांनी एवढी मते घेतली. चिन्ह न घेता ते लढले. चिन्ह जर घेतले असते.तर, 100 टक्के कलाटे आमदार झाले असते. आपण त्यांना जर आपण चिन्ह देऊ शकलो असतो.तर, 100 टक्के आपला हा माणूस आमदार झाला असता. पण, आपण फार युती धर्म पाळणारे लोक असतो.त्यांनी (भाजपने) आपल्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालतो. पण, आपण नको युती आहे, युती धर्म पाळला पाहिजे असे म्हणतो. पण, जेव्हा महापालिका, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतात. तेव्हा आपल्याला त्यांनी (भाजपने) किती युती धर्म पाळला हे कळते. आता धर्म युद्धाचा विचार सोडून आपण खऱ्या युद्धाकडे वळले पाहिजे”.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments