Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलल्या

Webdunia
बुधवार, 25 जानेवारी 2023 (15:37 IST)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड इथल्या विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. ही निवडणूक बिनविरोध केली जावी, यासंदर्भात राजकीय चर्चा सुरू झाली होती. परंतु, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यातच आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये आयोगाने बदल केले आहेत.
 
दरम्यान, निवडणूक आयोगाने याआधी १८ जानेवारी रोजी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, तमिळनाडू आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशामधील काही जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर २ मार्च रोजी मतमोजणीची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केला आहे.
असे आहे निवडणुकीचे नवीन वेळापत्रक
 
आयोगाने यासंदर्भात परिपत्रक काढून घोषणा केली आहे. या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाईल. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असेल. ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २ मार्च रोजी इतर राज्यांतील पोटनिवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या दोन मतदारसंघांमध्येही मतमोजणी करण्यात येईल. आयोगाच्या पत्रकानुसार ४ मार्चपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहे- नितीन गडकरी

Delhi Election: मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी एफआयआर नोंदवला

2 वर्षांच्या मुलाची विजेचा धक्का देऊन हत्या केली, आरोपीला 16 वर्षांनी अटक करण्यात आली

पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या 5 नवीन रुग्णांची नोंद

सिग्नल बिघाडमुळे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत, मुंबईला नवीन डिझाइनच्या गाड्या मिळतील- वैष्णव

पुढील लेख
Show comments