suvichar

भुशी डॅम मध्ये तरुण बुडाला

Webdunia
सोमवार, 11 जुलै 2022 (23:23 IST)
सध्या राज्यात पावसाने जोर धरला आहे. पावसाचा हंगाम असल्यामुळे लोक सहलीसाठी पर्यटनस्थळी जात आहे. सध्या लोणावळा आणि खंडाळा पर्यटकांनी गजबजले आहे. लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या राज्यात सर्व डॅम ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असता लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम मध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.साहिल सरोज(19 रा.मुबई ) असे या मयत तरुणाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल आणि त्याच्या गटातील 250 पेक्षा अधिक सहकारी लोणावळ्यातील भुशी डॅमला वर्षाविहारासाठी आले होते. भुशी डॅमच्या धबधब्यात साहिल भिजत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला आणि सुमारे 25 ते 30 फूट उंचीवरून वाहत जाऊन बॅक वॉटर मध्ये बुडाला. या घटनेची माहिती मिळतातच लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने  घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने साहिलचा शोध घेत आहे.अद्याप शोध मोहीम सुरु आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये सावत्र मुलाने आपल्या आईवर लैंगिक अत्याचार केला, कौटुंबिक बदनामीमुळे पतीने गप्प राहायला सांगितले

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा खान यांच्या अटकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात

मुंबई उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात नोटीस बजावली

LIVE: मुंबईत गोवंडीच्या शाळेत ६ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर मार्ग भरकटले, पण वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे ते सुरक्षितपणे उतरले

पुढील लेख
Show comments