Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीच्या कांडलीत गॅस सिलिंडरच्या गोदामाला आग लागली

Webdunia
रविवार, 24 एप्रिल 2022 (13:28 IST)
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जवळील कांडली गावात गॅस सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग लागली . ही आग आज सकाळी लागली. आगीमुळे आतापर्यंत 10 ते 11 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. कांडली गावातच एका गॅस एजन्सीच्या गोदामाला ही आग लागली. या भीषण आगीच्या लाटा  दूरवर पसरल्या. सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. सकाळी आठच्या सुमारास स्फोटाचा पहिला आवाज ऐकू आला. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

<

अमरावती जिल्ह्यातील कांडली येथील सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग. सिलिंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज दोन किलोमीटरपर्यंत दणाणला. pic.twitter.com/2Z6UmQeUPS

— Govind Hatwar (@GovindHatwar) April 24, 2022 >या घटनेचे व्हिडीओ मध्ये आगीचे लोळ दुरूवर दिसत आहे. आगीमुळे झालेल्या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील कांदळी ग्रामपंचायतीत एचपी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. आज सकाळी आठ वाजता याच गोदामाला आग लागली आणि बघता बघता एकापाठोपाठ एक सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच अचलपूर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
 

संबंधित माहिती

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments