Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्दैवी : शेतीची मशागत करताना अनर्थ घडला, रोटाव्हेरमध्ये अडकून टॅक्टर चालकाचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (20:45 IST)
सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी झाल्याने ते रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहे. अशातच  वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीची मशागत करताना तोल गेल्यामुळे चालक टॅक्टरवरून खाली पडला आणि टॅक्टरला लावलेल्या रोटाव्हेटरमध्ये  आल्याने टॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे ही घटना घडली आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,   समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे शेताची रोटाव्हेटरने मशागत सुरु होती. त्याचवेळी टॅक्टर चालकाचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी तो थेट रोटाव्हेटरमध्ये आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये टॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुरषोत्तम देवराव धोटे असं मृत टॅक्टर चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे निरगुडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
निरगुडी येथील निलेश धोटे यांनी रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी रोटाव्हेटर यंत्र असलेले टॅक्टर बोलावले होते. शेतीची मशागत सुरु असताना अचानक टॅक्टरचालक पुरषोत्तम धोटे याचा टॅक्टरवरून तोल गेला आणि ते खाली पडले. यात पुरषोत्तमच्या अंगावरून टॅक्टरचे मोठे चाक गेले आणि त्याचे पाय रोटाव्हेटरमध्ये अडकले.
 
या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या पुरषोत्तम यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती निरगुडी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संपूर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी पुरषोत्तम यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. या घटनेमुळे गावात खळबळ माजली असून याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

या 4 कारणांमुळे छगन भुजबळांना मंत्री पद दिले नाही ! महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा

महायुतीत पुन्हा फूट , विधानपरिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी, शिंदे नाराज

LIVE: महायुतीत पुन्हा दरारा, विधानपरिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी, शिंदे नाराज

कोण आहे संसदेत हाणामारीत जखमी झालेले प्रताप सारंगी ?

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

पुढील लेख
Show comments