Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटक वॉरंट तामिल करायला गेलेल्या पोलिसांवर जीवे हल्ला ; एक जागीच ठार तर दोन जखमी

Webdunia
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (16:16 IST)
विधार्भातील यवतमाळ येथील मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी आरोपीनी अचानक पोलिसांवर हल्ला चढवला. यात एक पोलीस ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि.२६ सोमवारी मध्यरात्री दरम्यान घडली. यामुळे मुख्यमंत्री असलेल्या विधर्भातील पोलीस असुरक्षित आहेत असे समोर येते आहे.  
 
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या हिवरी येथील ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके वय ५२, हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे वय ४८, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे वय ३१, पो.चालक राहुल बोन्डे वय ३२, पोलीस नाईक निलेश वाढई वय ३५ सर्व पोलीस वाहन क्रमांक एम.एच. ३७ ए ४२४६ ने अजामीनपात्र वारंट घेऊन आरोपी अनिल लेतू मेश्राम वय ३५ याला ताब्यात घेण्याकरीता आरोपीच्या घरी आज सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास गेले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला आवाज देऊन पोलीस असल्याचे सांगितले. तुझ्यावर अटक वारंट आहे. म्हणून पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. तेंव्हा मी येत नाही. तुम्ही माझे काय करता ते मी पाहून घेतो. मला हात लावून दाखवा असे म्हणत आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला होता. अचानक झालेल्या हल्याने पोलीस घाबरून गेले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांच्या डोक्याला, हाताला आणि तोंडाला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलीसांनी स्वरक्षणासाठी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले. यावेळी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे या हल्यात गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीच्या आक्रमक भूमिकेमुळे घाबरून पोलिसांनी मोठ- मोठ्याने आवाज देत गावातील लोकांना मदतीला बोलविले. मात्र आरोपी अंधारात पळून गेला.यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले. गंभीर जखमी राजेन्द्र कुळमेथे यांना घेऊन पोलीस माघारी मारेगावला आले. राजेंद्र कुळमेथेसह सर्व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी कुळमेथे यांना मृत घोषित केले. तर मधुकर मुके, प्रमोद फुफरे यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची फिर्याद हवालदार मधुकर मुके यांनी मारेगाव पोलिसात दिली.मारेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत अनिल मेश्राम याच्यावर भा द वी 324 ; 452 गुन्हा दाखल होता. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आरोपी न्यायालयात कधीही हजर झाला नव्हता. न्यायालयाने आरोपीवर अटक वॉरंट बजावला होता . तो तामिल करण्यासाठी हे सर्व पोलिस गेले होते. आरोपी हा विकृत असल्याचे समजते. यापूर्वीही त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे समजते. या घटने नंतर पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

ठाण्यामध्ये लाखोंचा गुटखा जप्त, एका आरोपीला अटक

एरिगेने चेन्नई ग्रँड मास्टर्समध्ये बुद्धिबळ तिसरी फेरी जिंकली, दुसरे स्थान गाठले

ब्युटीशियनची हत्या करून तिचा मृतदेह लपवल्याच्या आरोपीला मुंबईतून अटक

सांगा धारावीमध्ये काय काम केले-नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिले आव्हान

पुढील लेख
Show comments