Dharma Sangrah

भाजप आमदाराच्या लाचखोर भावास अटक

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (15:55 IST)
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोर लिपिक संजय पटेल हे नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत, हे विशेष.
 
नळजोडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यांच्याकडे संजय पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाती. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल यास १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
 
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने संजय वनारसीभाई पटेल (वय 45) यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून शुक्रवारी सायंकाळी (ता.२) सापळा रचला. त्यानुसार पथकाने त्यांना तक्रादाराकडून लाच स्वीकारताना अटक केली. संजय पटेल हे आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत, हे विशेष. याप्रकरणी पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अमेरिकेत बर्फाळ रस्त्यांवर लोक अडकले; 50 हून अधिक मृत्यू

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल, 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला निकाल

नाशिकात महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांचा निषेध,2 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने निदर्शने सुरू

LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल

आरसीबीने यूपीडब्ल्यूचा 8 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

पुढील लेख
Show comments