Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक मनपाचा लाचखोर कर्मचारी जाळ्यात; रस्ता खोदण्यासाठी मागितले २४ हजार रुपये

Webdunia
गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (08:55 IST)
नाशिक महापालिकेचा लाचखोर कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. महापालिच्या अंबड विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेला तांत्रिक सहाय्यक भाऊराव काळू बच्छाव हा तब्बल २४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
 
महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकणे आवश्यक होते. त्यासाठी रस्ता खोदण्याचा परवानगी अर्ज महापालिकेत सादर करण्यात आला. या अर्जास मंजुरी देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम २४ हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली. त्याची दखल घेत एसीबीच्या पथकाने सापळा रचला. आणि बच्छाव हा या सापळ्यात अडकला. २४ हजार रुपयांची रक्कम घेताना बच्छाव हा रंगेहाथ पकडले गेला. आता याप्रकरणी बच्छाववर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  तसेच, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
 
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणे गुन्हा आहे. असा प्रकार होत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

चीनने ट्रम्प यांना टॅरिफवर खुले युद्धाचे आव्हान दिले, सर्व आघाड्यांवर तयार असल्याचे सांगितले!

Mohammed Shami Energy Drink Controversy : खेळ, धर्म आणि समाज यांच्यातील तणाव

एस. जयशंकर यांच्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला

मुंबईत 12 वर्षांच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, 5 जणांना अटक

राज्यात साखर उत्पादन 20 % ने घटले, 92 साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप थांबले

पुढील लेख
Show comments