Festival Posters

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

Webdunia
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:55 IST)
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना  मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पंकज भुजबळ यांची त्यांच्याशी भेट झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी पंकज भुजबळ यांना सांगितले की ,भुजबळ समर्थक जोडो अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अन्याय पे चर्चा कार्यक्रमाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानत आहे. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की,कार्यकर्त्यांनी भावनाप्रधान न होता संयम बाळगावा आणि सहानुभूतीपोटी चालविलेल्या राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी थांबवाव्या. आपला न्यायालयीन प्रक्रियेवर आणि माननिय न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. न्यायालयाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी भावनिक न होता संयम बाळगावा आणि आपले सामाजिक कार्य अखंड सुरु ठेवावे अशा सुचना त्यांनी पंकज भुजबळ यांना केल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आ.पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Maharashtra ban on plastic flowers सजावटीसाठी खऱ्या फुलांचा वापर करा अन्यथा कारवाई होईल; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

LIVE: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या कॉपीबाबत फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली

महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहनांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; मंत्री सरनाईक यांचे आरटीओला निर्देश

पालघर जिल्ह्यात व्हॉट्सअॅप डीपीवरून झालेल्या वादात तरुणाची चाकूने वार करून हत्या

गुजरातमध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच पोस्ट ऑफिसना मिळाले धमकीचे ईमेल

पुढील लेख
Show comments