rashifal-2026

नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वीज बिल भरण्याची सक्ती करू नये - छगन भुजबळ

Webdunia
बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (14:50 IST)
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी कृषीपंपाचे थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक करण्यात आले आहे. २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास ३ हजार तर त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कृषी ग्राहकांनी ५ हजार रुपये भरल्याशिवाय रोहित्र बसविले जात नसल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
राज्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र रोहीत्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपाची थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments