suvichar

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच स्मारकाचे काम पूर्ण केले नाही - मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:41 IST)
भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केल्याची टीका त्यांनी केली. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही. नागपूर येथील भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.
 
फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीलाही लक्ष्य केले. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे.असे फडणवीस यांनी मत यक्त केले.मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. निधीही मोठ्याप्रमाणात दिला. २०२० पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा

LIVE: अमृत ​​भारत एक्सप्रेस ५ मे पासून मुंबई आणि अयोध्या दरम्यान नियमित सेवेसह धावणार

1 मे पासून अनेक नियम बदल, वाचा

Exit Poll: आजच्या चाणक्य एक्झिट पोलनुसार भाजप १९२ हून अधिक जागांवर पुढे, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पुढील लेख
Show comments