Festival Posters

हिंदू दहशतवाद असे कधी करकरे म्हटले नाहीत - मुख्यमंत्री

Webdunia
मंगळवार, 7 मे 2019 (09:39 IST)
साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेले विधान अयोग्य, त्यांनी असे विधान करायला नको होते. "हिंदू दहशतवाद" हा शब्दप्रयोग करकरेंनी कधीच वापरला नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदूर येथे बोलून दाखवले. माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यू आला, त्यांनी "हिंदू दहशतवाद" हा शब्दप्रयोग कधीही वापरला नव्हता असे विधान फडणवीस यांनी प्रसंगी केले. बृहन्महाराष्ट्र समाज इंदूर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.
 
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग सर्वप्रथम दिग्विजय सिंह यांनीच समोर आणला, तो नंतर सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांनीही वापरला, असे फडणवीस म्हणाले आहेत. भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या साध्वी प्रज्ञा आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांची सरळ लढत १९ एप्रिलला भोपाल येथे  होत आहे. साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंविषयी केलेल्या विधानाशी पक्ष सहमत नव्हता, शिवाय प्रज्ञा यांनी आपले विधान नंतर मागे घेतले असेही त्यांनी  सांगितले. या कार्यक्रमाला मावळत्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन याही उपस्थित होत्या. महाजन यांनी याआधीच प्रज्ञा यांच्या विधानाचे जाहीर समर्थन केले. विकास आणि राष्ट्रवाद हेच या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. अनेक राष्ट्रातील निवडणुका या राष्ट्रीय सुरक्षेवर होत असताना, राष्ट्रवादाच्या मुद्यावर विरोधकांचा आक्षेप न समजण्यासारखा आहे. गरिबी आणि भ्रष्टाचारावर सुद्धा मोदीजींनी जो प्रहार केला, इतके काम इतिहासात कधी झाले नाही. 30 वर्ष इंदूर भाजपासोबत राहिलं आणि मला खात्री आहे की, यापुढेही भाजपासोबतच राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 100 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली, 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार

लातूरमध्ये तरुणाची पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या

LIVE: अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली

शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

पुढील लेख
Show comments