Festival Posters

सरकारी रुग्णलयाच्या परिसरात चावा घेतला कुत्र्याने

Webdunia
बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:23 IST)
लातूर येथे तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या परिसरात घडली आहे. गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लातूर सर्वोपचार रुग्नालयात वास्तव्यास असलेल्या समर्थ महादेव देवके नामक मुलाव्र चार कुत्र्यांनी हल्ला केला. त्याच्या शरिरावर डोळ्यापाऊन पायापर्यंत अनेक ठिकाणी चावे घेतले. समर्थ हा त्याच्या नातेवाईकासोबत मिरवणूक पाहण्यासाठी त्याच्या आजोबाच्या घरातून बाहेर पडला असता त्याच्या अंगावर सर्वोपचार परिसरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात समर्थ जबर जखमी झाला आहे. त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे लस उपलब्ध नसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते. समर्थचे आजोबा चंद्रकांत बेकरे हे शासकीय रुग्नालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहेत. आजोबा सोबत कॉर्टरमध्ये समर्थ राहतो. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा आणि डुकरांचा रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकास सतत धोका जाणवतो. प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाय डेंग्यूही वाढत आहे त्यावरही इलज करावा अशी विनंती पक्षी-प्राणी मित्र प्रशांत जोजारे यांनी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत महायुतीला धक्का, भाजप आणि शिवसेना आमनेसामने

विश्वविजेता गुकेश 12 वर्षांच्या खेळाडू सर्गेई स्लॉटकिन कडून पराभूत

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

पुढील लेख
Show comments