Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

Webdunia
बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:31 IST)
एका विशिष्ट कंपनीचे खाद्य खाल्ल्याने पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यानी अंडे देण्याचे बंद केल्याने काही पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनीही या शेतकऱ्यांची तक्रार या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
 
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आळंदी म्हातोबा येथील काही पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी एका कंपनीकडून कोंबड्यांसाठीचे खाद्य विकत घेतले होते. हे खाद्य खाल्ल्यानंतर कोंबड्यानी अंडे देणे बंद केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी एकत्र येत लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि संबंधित कंपनी विरोधात तक्रार दिली.
 
पोलिसांनीही या शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनादेखील या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संबंधित कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments