Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाशीम येथे बापाने 1 वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरले

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (10:51 IST)
वाशीम: सुरेश घुगे असे निर्दयी पित्याचे नाव असून त्याने आपल्या १ वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरल्याची (buried) घटना काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.  
 
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत शेतातील गोठ्यावर राहत होता. पती-पत्नींना तीन मुली असून, सुरेश हा नेहमी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घेत असे यातूनच दोघांमध्ये नेहमी वाद व भांडण होत असत
 
सुरेशला दारूचे व्यसन असल्याने,  दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी दिराला हकिकत सांगितली. गावातील नागरिक शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली असता ही हकीकत त्याने स्वतः सांगितली. याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून, आरोपी पिता सुरेश घुगे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments