rashifal-2026

मटणावरून वडिलांची हत्या

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (12:14 IST)
मटण खायला घालत नाही म्हणून रागावलेल्या मुलाने कुऱ्हाडीचे वार करत आपल्याच वडिलांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कासारवाडी येथील आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
कासारवाडी गावाच्या हद्दीत भंडारदरा मळवी शिवारात पांडुरंग सस्ते हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. 29 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजल्याच्या दरम्यान, पांडुरंग यांचा मुलगा नटराजने तुम्ही मटण खायला का घालत नाही म्हणून वाद घालायला सुरुवात केली.
 
हा वाद सुरु असतानाच अवघ्या काही क्षणात नटराजने कुऱ्हाड हातात घेऊन वडिलांच्या मानेवर आणि डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलगा नटराजला अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा १२ वा दिवस; १४० अमेरिकन सैनिक जखमी तर ९ देशांमध्ये तेल संकट

बीसीसीआयची घोषणा; या दिवशी पाच विश्वविजेत्या भारतीय संघांचा सन्मान केला जाणार

मुंबई विमानतळावर कोरफडीच्या पावडरमध्ये लपवलेले २२ किलोग्रॅम एटिमिडेट ड्रग्ज जप्त

मुंबई: वैद्यकीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक

पश्चिम रेल्वेवरील 'कवच' प्रणालीसाठी रेल्वे ७६५ कोटी खर्च करणार, १८८ कोटी मंजूर

पुढील लेख
Show comments