Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई: कमला मिल कंपाउंडमध्ये आग, 14 जणांचा मृत्यू

Webdunia
मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.
 
कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास  ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली.  टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते.  घटनेच्या वेळी बारमध्ये एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती, असे समजते. आग नेमकी कशामुळे आग लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
कमला मिल कंपाऊंडमध्ये मराठी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे तसेच खासगी कंपन्यांचे कार्यालय आहे. कंपाऊंडमध्ये अंदाजे ४२ रेस्टॉरंट आणि पब आहेत. या आगीचा फटका काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांनाही बसला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments