Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये 18 लाखांचा गुटखा जप्त

नाशिकमध्ये 18 लाखांचा गुटखा जप्त
Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2024 (10:01 IST)
नाशिक  :  प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून वाहतूक करताना आढळून आलेल्या ट्रकचालकासह क्लिनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन 18 लाख 57 हजार 120 रुपयांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू व ट्रक असा एकूण 30 लाख 7 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
 
याबाबत गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की संशयित अमोल ज्ञानोबा इंगुळकर (वय 37, रा. कामथडी, जि. पुणे) व जाबिर अफजल बागवान (वय 36, रा. बुधवार पेठ, सातारा) हे दोघे अनुक्रमे ट्रकचालक व क्लिनर आहेत. हे दोघे जण काल (दि. 4) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पंचवटीतील पेठ रोडवरील मोती सुपर मार्केटसमोर होते.
 
त्यावेळी त्यांनी आणलेल्या एम.एच. 12 एम.व्ही. 7510 या क्रमांकाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या ट्रकमध्ये सुमारे 18  लाख 57 हजार 120 रुपये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक व वाहतूक करताना आढळून आले.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालक व क्लिनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये 6.32 लाख रुपयांचा बंदी घातलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ जप्त, गुन्हा दाखल

LIVE: माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार,विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार,विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

IPL 2025: अजिंक्य रहाणे बनला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार, तर वेंकटेश अय्यर संघाचा उपकर्णधारपदी

केरळला हरवून विदर्भाने जिंकले रणजी ट्रॉफीचे विजेतेपद

पुढील लेख
Show comments