rashifal-2026

त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली असती तरी चाललं असतं -आदित्य ठाकरे

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (08:02 IST)
माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिलं. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देणं अपेक्षित होतं. त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली असती तरी चाललं असतं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसंच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.
 
दुसरीकडे, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन करणाऱ्या तरुणांचा उल्लेख ‘शेंबडी पोरं’ आणि पत्रकारांचा उल्लेख ‘एचएमव्ही’ असा केला. या विधानाचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. दोन्ही विधानांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आपला शब्द मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात कारवाई न झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला

बीडमध्ये जीप आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत तीन जण ठार

LIVE: नागपूरमध्ये संरक्षण स्फोटकांच्या कंपनीवर ड्रोन उडताना दिसला

जिओने नवीन वर्षाच्या आकर्षक ऑफर्स, 5जी, ओटीटी आणि एआय अनुभवांचे संयोजन करणारे 3 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले

नागपूरमध्ये संरक्षण स्फोटकांच्या कंपनीवर ड्रोन उडताना दिसला, दक्षता वाढवली

पुढील लेख
Show comments