Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लालपरी आता कळणार नेमकी कोठे आहे, सुरु झाले लाईव्ह लोकेशन

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:10 IST)
सर्वांची आवडती आणि प्रवासी वर्गाला प्रत्येक गावात पोहोचवणारी लालपरी आता कोणत्या वेळेला आणि रस्त्यात नेमकी कुठे आहे हे कळणार आहे. अनेक ठिकाणी एसटी वेळेवर येण्याचं प्रमाण फारच थोडे आहे, त्यामुळे बस स्थानकावर प्रवासी वर्गाला  लवकर येऊन वाट पाहत बसावी लागते. पण आता प्रवाशांना लोकेशन (ST Bus live location) समजावं यासाठी वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) चं लोकार्पण केले आहे.  परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
 
नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना अचूक समजू शकणार आहे. तर बसस्थानकावर एलसीडी टीव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ देखील समजणार आहे.
 
नाशिक विभाग आणि मुंबई – पुणे – मुंबई, बोरीवली – पुणे -बोरीवली, ठाणे – पुणे – ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हीटीएस – पीआयएस प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. पुढील 5 ते 6 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांना व्हीटीएस (vehicle tracking system) बसविण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments