Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरला मिळणार आता सात दिवसाला पाणी

Latur
Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:29 IST)
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरुन महानगरपालिकेच्यावतीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शहराला आता 10 ऐवजी 7 दिवसाला पाणी मिळणार आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
शहराला पाणीपुरवठा होणार्यात केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जलसाठाझालाच नव्हता. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाले नसल्याने पावसाळ्यात प्रकल्पाची पाणीपातळी वाढली नाही. परतीचा पाऊस धावून आला, मांजरा धरणातील मृत जलसाठ्याची पाणीपातळी वाढली. परंतु जीवंत पातळीपर्यंत आली नाही. यामुळे उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविता यावे यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, सध्या उन्हाळा आणि त्यात कोरोनाचा धोका हे लक्षात घेता पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आता 7 दिवसाला पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाणे : महिलेवर लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याप्रकरणी तरुणाला अटक

ठाण्यातील प्लायवूड गोदामाला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी

मुलं लंडनला गेली आणि ड्रग्ज तस्कर बनली, नवी मुंबईतील श्रीमंत बिल्डर वडिलांची आत्महत्या

पाणीटंचाई दूर होईल,पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले कडक निर्देश

काटोल आणि नरखेड गावांचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल बावनकुळे म्हणाले

पुढील लेख
Show comments