Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात

Webdunia
मुंबईत आज निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून ५० हजार पोलिसांच्या ताफ्याची मंगळवारी रात्रीपासूनच गस्त सुरू झाली आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्यांची अपेक्षित संख्या लक्षात घेता, बंदोबस्तासाठी शहराबाहेरूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आझाद मैदानावर मोबाईल नेटवर्क जाम

● शिष्टमंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले

● शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देणार

● मराठा समाजातील तरुणींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनात

● काही वेळातच सरकारकडून घोषणेची शक्यता 

●आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही: तरुणींनी मांडली व्यथा
●मराठा समाजाला आरक्षण देता की जाता, तरुणींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
●मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजातील तरुणींची मागणी
●आझाद मैदानात मोर्चात सहभागी झालेल्या तरुणी निवेदन वाचून दाखवत आहेत.
● मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण घोषणा करणार: दानवे   
● मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा – नितेश राणे

● मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे – निलेश राणे
● काँग्रेस नेते निलेश राणे मोर्चात सहभागी.
●....म्हणून हवं आहे आरक्षण,काय म्हणाल्या रणरागिणी..... 
●महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग..... 
●मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं - खासदार संभाजीराजे छत्रपती
●मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार भगवे फेटे घालून सभागृहात
●सभागृहात  राजदंड उचलण्याचा विरोधकांचा प्रयत्न
●इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या- अजित पवार
●मराठा आरक्षणाबाबत सरकार विरोधी पक्षाला बोलू देत नाही. विखे पाटील विरोधी पक्षनेते
●मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव आजच करा- जयंत पाटील
●मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय मराठा आमदारांची जोरदार घोषणाबाजी.
●विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटांसाठी आणि पुन्हा विधानसभा तीन वाजेपर्यंत तहकूब.
●मराठा आरक्षणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी केला गदारोळ 
●सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन केला गदारोळ 
●आशिष शेलार यांना स्टेजकडे जाण्यापासून तरूणांनी रोखले
●मराठा मोर्चामुळे भायखळा येथील सेंट मेरी शाळेसमोरील मार्ग बंद केला
●द्रुतगती मार्गावर २० तज्ञ डॉक्टर आणि ३ रुग्णवाहिका सज्ज
●मराठा बांधवाकडून पोलिसांना पाणी आणि नाश्त्याचे वाटप
●बारामतीचे मावळे सायकलवरुन मुंबईत दाखल
●मराठा क्रांती मोर्चा सर्वात मोठी - मराठा मोर्चेकरी आमदारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार
●मराठा मोर्चा: मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर वसुली बंद
मराठा मोर्चा
●‘एक मराठा; लाख मराठा’ अशी घोषणा देत आज मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली आहे.
 
●मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.
 
● पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, आनंदनगरहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या गतीनं.
 
● मुंबई मराठा क्रांती मोर्चा : मुंबई जकात नाक्यावर वाहनं पार्क करुन मुंबईकडे जाण्याचे मोर्चेकरांना आवाहन.
 
● मुंबईकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून निर्णय MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
 
● मराठा क्रांती मोर्चा
वाशी टोल नाक्यावर वाहतूक सुरळीत. कोंडी टाळण्यासाठी टोलवसुली नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत मोठी 3000 तर लहान 200 वाहने मुंबईला रवाना.
 
● मराठा क्रांती मोर्चा
नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क
 
● मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; चंद्रकांत पाटील म्हणातात, सरकारचा विरोध नाही 
 
● अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास; 500 शाळांना सुटी, वाहतूक मार्गात बदल  
चेंबूरपासून वळवा वाहने
भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.
 
‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.
 
प्रश्न तत्काळ सोडवा : राणे
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
 
वैद्यकीय सुविधा सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत पराभूत,अंतिम फेरीत प्रवेश नाही

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

पुढील लेख
Show comments