Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशकात विवाहितेची आत्महत्या; ‘आई माझ्या मुलाला न्याय मिळवून दे’, तिचे शेवटचे शब्द

suicide
Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2023 (21:38 IST)
नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विष प्रश्न करून या महिलेने आपली जीवनयात्रा संपवली. शेवटच्या क्षणांत आपल्या बाळाची काळजी करत जळगाव येथे आईला फोन करून मुलगा नील याला न्याय मिळवून दे अशी मागणी आत्महत्या केलेल्या या महिलेने तिच्या आईकडे केली होती.
 
जळगाव शहरात या महिलेचे माहेर असून तिने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. दि.२७ रोजी ही घटना घडली. विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोन केला. तिने आईला ‘आई माझ्या निलला न्याय दे जो’ अशी आर्त हाक घातली. दरम्यान पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी की, जळगाव माहेर कोमल या तरुणीचा विवाह २०१६ मध्ये नाशिक येथील अभिजीत नामक तरुणाशी झाला होता. नाशकात त्यांचे कुटुंबीय एकत्र राहत होते. मात्र पावसाळ्यात घर गळत असल्याने कुटुंबीयांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. कोमल आणि अभिजितला निलराज हा मुलगा झाला. काही दिवसांनी सासू कोमल आणि तिच्या जावेसोबत वाद घालत असल्याने दोघी वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पती आणि मुलासह घर बदलल्यानंतर कोमलने तिचा छोटा व्यवसाय सुरु केला. तिथे ६ महिने गेले. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी जुन्या घराची दुरुस्ती केली असून ते सर्व तिकडे राहायला जात असल्याचे तिला सांगण्यात आले. कोमलने देखील पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ असा आग्रह धरला. मात्र पतीने नकार दिला. अशात कोमलने स्वतः सासूकडे आम्हाला देखील घरात राहू द्या अशी विनंती केली. मात्र सासूने देखील नकार दिला. सासूने नकार दिला असता जुन्या संपत्तीमध्ये मुलगा निलराज याचे देखील नाव घ्या अशी मागणी केली असता त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला.
 
सर्व प्रकार तिने मामसासरे यांना कळविला. त्यांनी कोमलच्या सासरच्या मंडळींना याबाबत विचारणा केल्याने सर्वांना कोमलचा राग आला. त्यांनी कोमलचा छळ सुरू केला. पती अभिजीतने ‘प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर मी तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल’ अशी धमकी देत, चारित्र्यावर संशय घेत त्रास दिल्याची माहिती आहे. तर घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई आणि भावाला कळवल्याची देखील माहिती आहे.
 
कोमलने घडत असलेला सर्व प्रकार आईला सांगितला मात्र तेव्हा फोन बंद केल्यानंतर माहेरच्यांचा तिच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला फोन आला. कोमलला उलट्या होत आहे असे एका अनोळखी महिलेने सांगताच कोमलने फोन घेतला आणि ‘आई आई माझ्या निलला न्याय दे जो’ असे बोलून फोन कट झाला. तिच्या पतीला फोन केला असता आपण बाहेर गावी असून घरी सर्व तिला शोधात असल्याची माहिती अभिजित ने कोमलच्या आईला दिली. त्यानंतर काही कोमलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून ती आयसीयूमध्ये असल्याचे तिच्या आईला कळाले. त्यांनी तात्काळ नाशिक गाठले रुग्ण्यालयात पोहोचल्या तोच डॉक्टरांनी तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान आता तिच्या आईच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात कोमलचा पती, सासू, जेठ आणि दिर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

मंत्री संजय शिरसाट म्हणाले आता रोबोट गटारांची साफसफाई करतील, महाराष्ट्र सरकार १०० रोबोट खरेदी करणार

लज्जास्पद : व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न

नशेत जन्मदाते वडीलच बनले राक्षस, १३ वर्षांच्या मुलाचे फोडले डोळे

Ladaki Bahin Yojana बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान, योजना थांबवली जाणार नाही आम्ही बजेट दिले

LIVE: नाशिकमधील दर्ग्यावरून दगडफेक 21 जखमी, 15 जणांना अटक

पुढील लेख
Show comments