rashifal-2026

नालसाब मुल्लाच्या खुनाचा २४ तासात छडा : तिघांना अटक; अल्पवयीन मुलाचा सहभाग

Webdunia
सोमवार, 19 जून 2023 (09:04 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मौला अली मुल्ला (वय ४८, रा. माने चौक, शंभरफुटी रस्ता ) याचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी सनी सुनिल कुरणे (वय २३, जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (वय २०, रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ), स्वप्निल संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) या तिघांना अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.

सांगलीतील एका खुनातील संशयिताला मोकामध्ये जामिन न होण्यासाठी मुल्ला प्रयत्न करत असल्यामुळे साथीदारांनी काटा काढल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
मृत नालसाब मुल्ला हा शनिवारी रात्री आठ वाजता त्याच्या बाबा सप्लायर्स या ऑफीसच्या दारात बसला असता दोन दुचाकीवरून हल्लेखोर आले. तेव्हा दोघांनी मुल्ला याच्याजवळ येऊन पिस्तुलातून गोळ्या घातल्या. तसेच दोघांनी तलवारीने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर शिवीगाळ, दमदाटी करत, तलवार नाचवत आणि हवेत गोळीबार करत अंधारात पळून गेले. या खुनानंतर अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खुनामागे काय कारण आहे, याचा शोध घेऊन हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे व सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना हा खून जयसिंगपूरच्या सनी कुरणे आणि साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच संशयित अंकली ते हरिपूर रस्त्यावर थांबल्याचे समजले. पथकाने तेथे जाऊन सनी, विशाल, स्वप्निल आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मुल्ला याच्या खुनाची कबुली दिली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

पुण्यातील वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक असल्याचा विद्यार्थिनींसाठी विचित्र आदेश

मंत्री अशोक उईके यांच्यावर ‘भूमाफिया’ असल्याचा गंभीर आरोप

15 जानेवारीला महापालिका निवडणुका, आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

पुढील लेख
Show comments