Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : 20 हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास अटक

Bribe
Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (21:57 IST)
20 हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सचिन काशिनाथ म्हस्के (वय 38) असे लाच घेणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मुरंबी येथील तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे इतर 3 भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या गाव नमुना 7/12 महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के यांनी 20,000 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. अखेर आज ही लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले.
 
ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी केली.

Edited  By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एअरटेल: 10 मिनिटांत तुमच्या घरी एअरटेलची सिम पोहोचेल, एअरटेलने 16शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली

कराडला मारण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा निलंबित पोलीस अधिकारी कासले यांचा खुलासा

फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

जागतिक आवाज दिन 2025: जागतिक आवाज दिन का साजरा करतात, महत्त्व जाणून घ्या

LIVE: फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

पुढील लेख
Show comments