Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात येणार नाही पाणी, ही घ्या परिसराची लिस्ट

Webdunia
पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या पर्वती, लष्कर, वडगाव, एसएनडीटी-वारजे आणि होळकर पंपिंग स्टेशनची देखभाल-दुरुस्तीची कामे होणार आहेत. गुरुवारी (दि.२९) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा संपूर्ण बंद राहणार असून, शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात कमी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा आहे.  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले. पर्वतीच्या नवीन जलकेंद्रासाठी महावितरणतर्फे वीज पुरवठ्याचे काम करणार आहेत.  वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे, पर्वती, नवीन होळकर या जलकेंद्रांतील पंपिंग स्टेशनमध्ये ही दुरुस्तीची केली जाणार आहेत.  त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

खालील सर्व भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद :   
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र :
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता,  सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र. 
 
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर. 
 
लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी. 

नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या न्यायालयाने 4 भारतीय मारेकऱ्यांचा जामीन मंजूर केला

पालघर येथे फ्लॅटमध्ये परफ्यूमच्या बाटल्यांमधील गॅसमुळे स्फोट, चार जण जखमी

LIVE: मुंबई महानगरपालिका जनतेच्या मदतीने आपले बजेट ठरवेल

जनतेच्या सूचनांवरून मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार केला जाईल, नागरिकांकडून मागवले मत

प्राण प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रामलला सोनेरी वस्त्र परिधान करणार, योगी आदित्यनाथ करणार अभिषेक

पुढील लेख
Show comments