Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता महानगरपालिकेत मिळणार ऑनलाईन पध्दतीने विकसन परवानग्या

Webdunia
गुरूवार, 17 जून 2021 (09:01 IST)
महाराष्ट्र शासनाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली ३ डिसेंबर २०२० पासून सर्व राज्यात लागू केली आहे. सदर नियमावलीनुसार संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने विकसन परवानग्या देण्यासाठी शासनाने महा आयटी यांचे सहकार्याने संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रायोगिक तत्वावर एकूण १८ ठिकाणे निश्चित करणेत आलेली आहे. त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून संगणकीय प्रणालीतून नाशिक महानगरपालिकेने सर्वात पहिली परवानगी दिली आहे. अशा पध्द्तीने यशस्वीरित्या संगणकीय प्रणालीची चाचणी झाली आहे. एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली तसेच संगणकीय प्रणाली विकसित केल्यामुळे नागरिकांना तसेच वास्तुविशारद, अभियंता यांना वारंवार कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासु नये, या दृष्टीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव भुषण गगराणी, संचालक नांगनूरे, सह सचिव तथा संचालक शेंडे ,सहसंचालक प्रतिभा भदाणे, तसेच शासन नियुक्त संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी असलेल्या टीमचे सह संचालक अविनाश पाटील साहेब, सहसंचालक (सेवा निवृत्त) भुक्तेव शैलेंद्र बेंडाळे, शहर विकास व नियोजन अधिकारी ठाणे महानगरपालिका, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.या प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व प्रथम परवानगी पत्र आयुक्त कैलास जाधव, सहसंचालक, श्रीमती प्रतिभा भदाणे, सहायक संचालक अंकुश सोनकांबळे, नगर नियोजन विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत वास्तुविशारद अजित कुलकर्णी यांना आज रोजी देण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

महाविकास आघाडीत 130 जागांच्या वाटपावर झाले एकमत

भररस्त्यात महिलेला प्रसव वेदना, मुंबई पोलिसांनी करविली सुखरूप प्रसूती

International Day of Peace 2024 : 21 सितंबर अंतरराष्ट्रीय शांति दिवसचा इतिहास आणि महत्त्व काय आहे

चोरीच्या संशयावरून तीन तरुणांना दोरीने बांधून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

दारूच्या नशेत पित्याने एका महिन्याच्या मुलीला मारले

पुढील लेख
Show comments