Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महत्वाच्या 'दिशा’ कायद्याचे महिला आमदारांसमोर सादरीकरण

Webdunia
महिला सुरक्षा आणि तत्सम उपाययोजनांसदर्भात 'दिशा’ कायद्याचे महिला आमदारांसमोर सादरीकरण  महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सर्व महिला आमदारांची बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली. 
 
या बैठकीत आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याविषयक तसेच महिला अत्याचारविषयक इतर कायद्यातील  तरतुदींची माहिती देण्यात आली.  कायद्यातील  तरतुदींची माहिती देण्यात आली. राज्यात करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने महिला आमदारांच्या सूचना जाणून घेतल्या.
 
महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय घेऊन राज्य शासन या विषयासंबंधी संवेदनशील असल्याचे दिसून येते अशी भावना महिला आमदारांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल अशा प्रकारच्या तरतुदी कायद्यात कराव्यात अशी मागणी करुन कायद्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गृहमंत्री  देशमुख तसेच महिला व बाल विकासमंत्री ॲड. ठाकूर यांचे महिला आमदारांनी अभिनंदन केले.
 
महिलांविषयक आदर राखण्याविषयी मूल्यशिक्षणाचा तसेच कायद्यातील तरतुदींच्या माहितीचा शालेय शिक्षणामध्ये समावेश करावा. अस्तित्वात असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. करण्यात येणाऱ्या कायद्यातील तरतुदींची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्यात यावी. राज्यात सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करावी आदी सूचना महिला आमदारांनी केल्या.
 
गृहमंत्री देशमुख म्हणाले, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा करुन महिला अत्याचारांना प्रतिबंध करणारा कायदा या अधिवेशनातच करण्यात येईल. राज्यात सुरक्षेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार यापुढे नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतींना बांधकाम परवाने देताना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी नियमात सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच जुन्या इमारतींनाही सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले जाईल. मुंबईमध्ये सुमारे 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून आणखी 5 हजार कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पुण्यातही 1 हजार 300 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून आणखी नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

8-10 दिवसांत नवीन टोल प्रणाली लागू केली जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा

पक्षाच्या प्रवक्त्यांबाबत उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, या 7 नेत्यांना दिले विशेष स्थान

नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

पुढील लेख
Show comments