Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची ‘लुकआऊट नोटीस’

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:38 IST)
कॉर्टेलिया क्रूझवर एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना अटक केली. या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो एक सराईत गुन्हेगारअसल्याचे समोर आले आहे. किरण गोसावी याच्यावर पुणे आणि मुंबईत  गुन्हे ( दाखल असून पुणे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस  काढल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे  यांनी सांगितली.
 
किरण गोसावी याच्यावर दाखल असलेले गुन्हे हे लोकांची फसवणूक  करुन लाखो रुपये घेणे, धमकी  देणे यासारखे गुन्हे आहेत. काही गुन्ह्यामध्ये त्याला अटक (Arrest) झाली होती तर एका गुन्ह्यात तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे. पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात फरार असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस काढली आहे.गोसावी विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
 
आरोपी किरण प्रकाश गोसावी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. किरण गोसावी याने मे 2018 मध्ये फेसबुकवरुन मलेशियातनोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखाची फसवणूक केली होती. फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना मलेशियाला पाठवले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात  29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
 
ठाण्यातील गुन्ह्यात चार्ज शीट दाखल
किरण गोसावी हा ढोकाळी येथील राहणारा आहे. त्याच्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 2015 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला अटक देखील करण्यात आली होती.एका व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखून पैसे उकळल्याचा आरोप त्याचावर करण्यात आला होता.त्यांनंतर त्याला अटक करण्यात आली होती.या केसमध्ये चार्ज शीट दाखल (charge sheet) करण्यात आली असून सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments