Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आबांची कन्या होणार थोरात यांची सून

Webdunia
राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या कन्येचे शुभमंगल येत्या महाराष्‍ट्रदिनी होणार आहे. पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे हा विवाह सोहळा संपन्‍न होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे. 
 
राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष असणार्‍या आर. आर. आबांच्या कन्या स्‍मिता पाटील या दौंडच्या सुनबाई होणार आहेत. पुणे जिल्‍हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. या नव्या नात्यामुळे राज्यातील पाटील व थोरात ही दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत. 
 
आर. आर. आबांच्या निधनानंतर पाटील कुटुंबीयांवर राष्‍ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे जबाबदारीच्या दृष्‍टीने विशेष लक्ष असते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच या विवाहासाठी पुढाकार घेतला आहे. आर. आर. पाटील व रमेश थोरात हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत.
 
माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या निधनानंतर त्यांच्या तासगाव मतदार संघाचे नेतृत्‍व पत्‍नी सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत स्‍मिता यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली होती. तसेच राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याकडे युवती अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments