Festival Posters

राज ठाकरे आज ठाण्यात, शाखाध्यक्षांची घेणार कार्यशाळा

Webdunia
गुरूवार, 19 एप्रिल 2018 (10:57 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा १ मे पासून सुरू होत आहे. त्याआधी गुरुवारी अर्थात आज सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होत असून त्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी राज यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता. यात त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर, गडकरी रंगायतनसमोर त्यांची जाहीर सभा झाली. आता ते थेट पक्षातील पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रथमच कार्यशाळा होत असून पहिली कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. त्यानंतर विविध शहरांत कार्यशाळा होतील, असे जाधव यांनी सांगितले. शहरात २२६ पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्या नी लोकोपयोगी कामे कशी करावीत, जनसंपर्क कसा वाढवावा आदी अनेक मुद्यांवर राज मार्गदर्शन करणार आहेत. राज हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर, "धुरंधर देवेंद्र" पोस्टर्स मुंबईत लावले

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

बीएमसी निवडणुकांच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी रसमलाईचे फोटो पोस्ट करून राज यांच्यावर टीका केली

"सुंदर मुलगी दिसली तर तिच्यावर बलात्कार..." काँग्रेस आमदाराच्या वादग्रस्त विधानाने गोंधळ उडाला

EPFO चे पैसे आता UPI वापरून काढता येणार

पुढील लेख
Show comments