Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी महामार्ग ११ डिसेंबरपासून होणार खुला; द्यावा लागणार एवढा टोल

Webdunia
सोमवार, 5 डिसेंबर 2022 (15:11 IST)
मुंबई  – देशाची आर्थिक व महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यांना जोडणारा ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग आता सज्ज झाला आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबरला होणार आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. तो बनवण्यासाठी सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने वाहने चालवता येतील.
 
दिवाळीत उदघाटन
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे.नागपूर ते शिर्डी पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई हे जिल्हे आणि जवळपास २६ तालुके आणि ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.
 
एवढी असेल वेगमर्यादा
महामार्गाची एकूण रुंदी १२० मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही २२.५ मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा १५० किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही. या महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे. जवळपास ५० पेक्षा जास्त उड्डाणपुल, २४ हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच ५ बोगदे प्रस्तावित आहेत.
 
इतक्या वर्षांसाठी टोल
या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या प्रवासासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागणार आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावर टोल दराची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षांसाठी म्हणजे २०२५ पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत. नागपूर ते मुंबई असा थेट ७०१ किमी अंतरासाठी जवळपास १२०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. चार चाकी वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोल आकारणी होणार आहे. हा महामार्ग खासगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे.
 
वाहनांनुसार टोल
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गावर मोटर, जीप, व्हॅन आदी हलकी मोटर वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. १० ) तसेच हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी ५.८ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. त्याशिवाय, तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ६.३८ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी ९.१८ रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी (चौदा किंवा जास्त चाकांची वाहने) ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

IPL Auction: IPL 2025 चा मेगा लिलाव संपला, पंत राहिला सर्वात महागडा खेळाडू, वैभव बनला करोडपती

मुंबईच्या लोकल ट्रेनचे रूपांतर होणार एसी ट्रेनमध्ये

Mumbai Digital Arrest मुंबईतील सर्वात मोठी डिजिटल अटक, 1 महिना व्हॉट्सॲप कॉलवर ठेवले, 6 खात्यांमधून 3.8 कोटी लुटले

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments