Festival Posters

महावितरणचे आवाहन; धातूमिश्रित मांजा टाळा

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2017 (16:59 IST)

मकर संक्रांतीला महिनाभराचा कालावधी असला तरीही पतंगोत्सव साजरा करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. त्यातच वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात शहरातील दहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागण्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्याफिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेतअसे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र पतंग उडविताना उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह ग्रामीण भागात वीज वितरणासाठी लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले व युवकही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीज तारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा दहा वर्षीय बालकाचा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना धोक्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनांचे कोटिंग (आवरण) असल्याने वीज तारांच्या संपर्कात येताच या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावीअसे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतणारे ठरू शकते तसेच वीज वाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासंतास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावीअसे आवाहन महावितरणने केले आहे.

हे लक्षात ठेवा

वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.

वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टाहास करू नका.

वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.

धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.

दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मुंबईचा महापौर हिंदू किंवा मराठी नाही तर भारतीय असेल' हर्षवर्धन सपकाळ यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

महानगरपालिका निवडणुकांचे निकाल महायुतीसाठी त्सुनामी ठरतील,आशिष शेलार यांचा दावा

LIVE: महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली

वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा ऋषभ पंतचा विक्रम मोडला

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते,भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments