Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Satara : भिंतीवर डोकं आपटून पत्नीची निर्घृण हत्या,आरोपीला अटक

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (17:17 IST)
Satara : दारूचे व्यसन फारच वाईट असते. दारूमुळे अनेक घरे बरबाद झाले आहे. चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं भिंतीवर डोकं आपटून खून केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे घडली आहे. दीपाली धोंडीराम पुकळे वयवर्षे 29 असे या मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दिपालीच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धोंडीराम पुकळे असे आरोपीचे नाव आहे. 
 
सदर घटना म्हसवड येथे रविवारी घडली आहे. दीपाली हिचे लग्न धोंडीराम याच्याशी झाले. ते दोघे म्हसवडच्या सहकारनगर परिसरात एका इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायचे.दीपाली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून या दोघांना दोन अपत्ये होती. धोंडीराम ह्याला दारूचे व्यसन लागले. धोंडीराम शनिवारी रात्री दारू पिऊन आला. त्याला दिपालीच्या चरित्रावर संशय होता. त्यांच्यात दिपालीच्या चारित्र्याच्या संशयावरून जोरदार भांडण झाले. या भांडणात धोंडीराम ने दिपालीचं डोकं भिंतीवर आपटलं यामुळे दिपालीच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव सुरु झालं. नंतर तिला अलगद बेडवर झोपवलं आणि दोघे मुलांना जवळ झोपवले. 

रात्रभर धोंडीराम दिपालीच्या जवळ बसून होता. सकाळी मुले उठल्यावर धोंडीरामने मुलांना चहा बिस्कीट खायला दिली. आईला अजून कशी जाग आली नाही. दररोजच्या भांडणामुळे आई उशिरा झोपली असेल असे मुलांना वाटले नंतर धोंडीरामने मुलांना बाहेर खेळायला पाठविले. धोंडीराम देखील बाहेर गेला. मुले घरी आल्यावर आई अजून झोपली आहे. तिला उठवल्यावर काहीच हालचाल करत नाही. म्हणून जोरजोरात रडायला लागले.

शेजारी राहणाऱ्यांची त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ते बघायला आले असता त्यांना दिपालीचा श्वास बंद झाल्याचे आढळले. त्यांनी याची माहिती तिच्या आईवडिलांना दिली.त्यांनी पोलिसांत ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. आणि मृतदेह ताब्यात घेतले. 

धोंडीराम पत्नीची हत्या करून लपून बसला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.    
 






Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली

LIVE: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून 17 वर्षीय मुलाची हत्या, मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक

आता नागपूर एम्समध्ये यकृत प्रत्यारोपण होणार, मंजुरी मिळाल्यानंतर सीएसआर अंतर्गत शस्त्रक्रिया होणार

Israel Hamas War: इस्रायलने हमासच्या दहशतवाद्याला गाझामध्ये ठार केले

पुढील लेख
Show comments