Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतल्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

blood donation
Webdunia
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (08:12 IST)
मुंबईमध्ये आणि आसपासच्या उपनगरांमध्ये दिवाळीच्या सुट्यांमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच हा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रूग्णांमध्ये आणि रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक ब्लड बँकांमध्ये रक्ताचा शोध घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. शहरातील अनेक ब्लडबँकांनी त्यांच्याकडे मोजक्याच ब्लड ग्रुप्सचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. रक्ताच्या या तुटवड्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. वृत्तनुसार दिवाळीमुळे मर्यादित स्वरूपात रक्तदान मोहिम राबवण्यात आली होती. त्यामुळे, शहरात आणि आसपासच्या भागांमधील रक्तपढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.
 
ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर
रविवारी, बीवायएल नायर रुग्णालय वगळता अनेक ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर आला होता. शिवाय, रक्तसाठा उपलब्ध आहे का? अशी विचारणा डॉक्टर आणि रक्तपेढीचे कर्मचारी यांच्यामध्ये सुरू होती. परिणामी, या रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

नागपूर : दोन वाघांमध्ये झालेल्या भीषण लढाईत एका वाघाचा मृत्यू

५ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, हातपाय तोडून मृतदेह शेतात फेकून दिला

LIVE: विरोधी नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून निषेध

विरोधी नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून निषेध

१ मे पासून ATM चे नियम बदलत आहेत, पैसे काढण्यापासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत, या गोष्टी महागणार...

पुढील लेख
Show comments