Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डीत साई दर्शन बंद

खग्रास चंद्रग्रहण
Webdunia
खग्रास चंद्रग्रहण असल्याने साई मंदिर आज चार तास बंद असेल. या वेळेत भक्तांना दर्शन घेता येणार नाही. आज संध्याकाळी 5 ते रात्री 8.42 वाजेपर्यंत मंदिर बंद असेल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. तसंच, साईबाबांची संध्याकाळची धूप आरतीही रद्द करण्यात आली आहे.
 
संध्याकाळी 5 ते रात्री 8.42 वाजेपर्यंत समाधी मंदिरात पुजारी श्रींच्या समोर मंत्रोच्‍चार करतील. या कालावधीत दर्शन पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर रात्री 8.50 वाजता श्रींचे मंगलस्‍नान सुरु होईल. त्‍यांनतर श्रींचे वस्‍त्र अलंकार परिधार करुन श्रींची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल आणि त्‍यानंतर दर्शनरांग सुरु होईल.
 
ग्रहण कालावधीमुळे दिनांक 31 जानेवारी रोजी साईंची धुपारती होणार नाही. तसंच 31 जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता शेजारती आणि दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजता काकड आरती नियमितपणे होईल. ग्रहण कालावधीत टाईम दर्शन, सशुल्‍क दर्शन आणि धुपारतीचे पासेस देण्‍यात येणार नाही, याची साईभक्‍तांनी नोंद घेवून संस्‍थानला सहकार्य करावं, असं आवाहनही अग्रवाल यांनी केलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

मुंबईकरांना झटका, बेस्ट बसच्या तिकिटाचे दर वाढले

पहलगाम दहशतवादी हल्ल्या नंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल, हिंदुत्ववादी विचार मांडले

Akshaya Tritiya 2025: फक्त ९ रुपयांपासून सुरू करु शकता सोन्याची खरेदी, उत्तम ऑफर येथे उपलब्ध

RR vs GT : आयपीएल 2025 चा 47 वा लीग सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर

LIVE: कन्नड तालुक्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा

पुढील लेख
Show comments