Festival Posters

महत्वाची बातमी! बारावीचा निकाल आज जाहीर होणार

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2020 (10:01 IST)
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून पाहता येणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल १६ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
 
राज्य मंडळाच्या मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच अन्य सांख्यिकी माहितीही उपलब्ध होणार आहे. निकालाच्या दुसर्‍या दिवसांपासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास विषयांमध्ये त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे //verification.mh-hsc.ac.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्येही अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी १७ ते २७ जुलैपर्यंत छायाप्रतीसाठी १७ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
 
उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमून्यात शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. तसेच परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

देशातील ८ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अनेक भागात बर्फवृष्टीचा इशारा

अजित पवारांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार, शपथविधी सोहळा उद्या होणार

LIVE: सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी 'होकार'

निपाह विषाणूमुळे भारतात घबराट पसरली, संसर्गाची दोन प्रकरणे नोंदवली गेली

पुढील लेख
Show comments