Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ ! बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…-राधाकृष्ण विखे पाटील

शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ ! बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…-राधाकृष्ण विखे पाटील
Webdunia
शनिवार, 14 मे 2022 (08:47 IST)
हनुमान चालीसा म्हणणार्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार्याच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ असल्याने ते कृती करू शकत नसल्याचा टोला आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
 
शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधतांना आ. विखे पाटील म्हणाले की, एका बाजुला हिंदूत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदत्व गुंडाळून ठेवायचे असे चित्र शिवसेनेचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असतांनाही जे संभाजीनगरच नाव बदलू शकले नाहीत.एकप्रकारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला असल्याची टिका त्यांनी केली.
 
महाविकास आघाडी सरकारने सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत. शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही व औवेसींसारख्या लोकांनी त्यांचे गोडवे गायले तर तो सरकारचा तारणहार असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
 
मुळातच शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना त्यांचे हिंदुत्व समजेनासे झाले आहे, धर्म निरपेक्षता काय हेही त्यांना माहीती नाही. प्रत्येकवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घेतला जाणारा आधार आता फार काळ चालणार नाही, राज्यातील जनतेला कृती हवी आहे, ज्या तत्वासाठी शिवसेना सत्तेवर आली त्या मूळ हिंदूत्वालाच त्यांनी गुंडाळून ठेवले असल्याचा घणाघाती टिका आ.विखे पाटील यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: उल्हासनगर महानगरपालिका 'जनसंवाद बैठक' सुरू करणार

'मी राज ठाकरेंना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही', माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे मोठे विधान

मुंबई पोलिस बंदर क्षेत्राचे डीसीपी यांचा कार अपघातात मृत्यू

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून काँग्रेस संतापली, हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांना विचारला प्रश्न

कुणाल कामराला 'भारतविरोधी' परदेशी संघटनांकडून निधी मिळत आहे, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments