Dharma Sangrah

पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट

Webdunia
सोमवार, 21 मे 2018 (15:15 IST)
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली आहेत. या पोलीस शिपायाच्या क्रमांक दोनच्या पत्नीने केलेला धक्कादायक आरोप असा की, या लग्नांबाबत या तिघींना कानोकानी खबर देखील नव्हती. या महाभागाने प्रत्येक पत्नीला आपले केवळ तुझ्याच सोबत लग्न झाले आहे हे पटवून दिले होते. त्यामुळे  हे प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा कहर झाला एक नाही तर तीन लग्न केल्याचे आता उघड झाले आहे.

शिपाई विजय जाधव (वय-३८) याचा पहिल्या पत्नीसोबत बारामती कोर्टात गेले तीन वर्षांपासून केस सुरू असून, २४ डिसेंबर २०१६ ला एका  महिलेसोबत लपून विवाह केला आहे. यात नवीन  महिलेने दावा केला आहे की, त्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी पहिल्या लग्नाची ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती. तसेच, पहिल्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोटही झाला नाही. दुसरी बायको माहेरी जाताच विजय जाधवने थेट तिसऱ्या बायकोसाठी स्थळ शोधणे सुरू केले. १२ डिसेंबर २०१७ मध्ये त्याने तिसरे लग्न केले आहे.
 
विशेष म्हणजे त्याने तिसऱ्या बायकोपासूनही पहिली दोन लग्नं झाल्याची माहिती लपवली आहे. या  महिलेने आरोप केला आहे की, त्याने तीसऱ्या लग्नातही मुलींकडच्या मंडळीकडून ५०,००० रूपये हुंडा म्हणून घेतले आहेत. हा सर्व प्रकार पाहून पोलीसही आवाक झाले आहेत. त्यामुळे त्याचे खात्यातून निलंबन देखील केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

महाराष्ट्र सरकारने १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत किनारपट्टीच्या भागात मासेमारीवर बंदी घातली

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून वाघ गायब! वनविभागात खळबळ

पुढील लेख
Show comments