Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

swine flu infections in Maharashtra: राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला, 142 जणांना स्वाईनफ्लूची लागण, 7 मृत्युमुखी

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2022 (11:53 IST)
swine flu infections in Maharashtra: सध्या राज्यात सर्वत्र पावसाळा सुरु आहे. पावसाळा सुरु होताच विविध आजार डोकं वर काढतात. पावसाळा सुरु होताच राज्यात सध्या स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. राज्यात 8 जूनपर्यंत 8 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, तर शून्य मृत्यूची नोंद होती. जुलैपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर या आजाराचा संसर्ग वाढला आहे. 
 
राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 7 जणांचा मृत्यू आला आहे.
 
राज्यात  H1N1 (स्वाइन फ्लू) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे, असे महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकार्‍यांनी  आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
 
कोल्हापुरात तीन आणि पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.मुंबईत स्वाइन फ्लूचे 43 तर पुण्यात 23 आणि पालघरमध्ये 22 आहेत. नाशिकमध्ये 17 आणि नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 14, ठाण्यात सात रुग्ण आढळले आहेत.
 
आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

पुढील लेख