rashifal-2026

उदयनराजे रडत म्हणाले, 'हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं'

Webdunia
सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (16:01 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उदयनाराजे भावनिक झाले आणि म्हणाले की, "हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं." छत्रपती शिवाजी महाराजांवर जे वक्तव्य केले गेले आहे, ते निषेधार्ह आहे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
 
"महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून सुरुवात केली जाते. पण जर आज शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं करण्यात येत असतील आणि ती खपवून घेतली जाणार असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही," असे उदयनराजे भोसले म्हणाले.
 
"शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करत नसाल, तर शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही," असं म्हणत उदयनराजेंनी भाजपला घरचा आहेर दिला.
 
उदयनराजे म्हणाले की, "काही लोक म्हणतात, त्यांना लिहून देण्यात आलं, मग बोललं. पण असं होत नाही. ते सज्ञान आहेत. ते वयाने मोठे आहेत, राज्यपाल आहे. अशा जबाबदारीच्या पदावर असताना, असं विधान करता, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यायचा?" "कोण तो त्रिवेदी, म्हणे माफीनामा. त्याने बुद्धी चेक केली पाहिजे. सर्वजण मुघलांना शरण गेले होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले होते," असंही उदयनराजे म्हणाले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबत त्यांना सांगणार असल्याचंही उदयनराजे भोसले म्हणाले. "विरोधक कुणाला म्हणायचं, इथं प्रत्येकजण सोयीसाठी, राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरतात. मग अशावेळी सत्तेत कोण आहे, हे महत्त्वाचं नाहीय, इथं प्रत्येकानं ठाम भूमिका मांडणं आवश्यक आहे," असं उदयनराजे म्हणाले.

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

T20 World Cup विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

संयुक्त राष्ट्रांनी दुसरा जागतिक ध्यान दिन साजरा केला

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनके तरुणांची फसवणूक; मुंबईत आठ जणांना अटक

LIVE: महाराष्ट्रात आज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान

मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर, उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments