Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरकर दुष्काळाच्या लढ्यासाठी सरसावले ‘जलाग्रही लातूर’ चळवळ सुरु

ujani dam
Webdunia
सोमवार, 10 जून 2019 (16:42 IST)
सतत गंभीर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर शहरात शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकमात्र पर्याय असणाऱ्या उजनीचे पाणी मिळविण्यासाठी लातूरकर एकवटले आहेत. त्यांनी ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांनी उभारलेला राजकीय उपक्रम जोरदार पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे कोणाचाही राजकीय चेहरा नसताना सामान्य लातूरकरांनी दाखवलेला सहभाग यामध्ये अभूतपूर्व आहे. उजनीचे पाणी लातूरला मिळावे याची निवेदन लातूरकरांच्या वतीने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय जनशक्ती मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांना पाठवण्यात आले आहे. जलाग्रही लातूरच्या वतीने सामान्य लातूरकरांना एकत्रित करून उजनीच्या पाण्याकरिता आग्रही भूमिका घेण्यात येत असून, यामध्ये सर्वसामान्य लातूरकर सहभाग घेताना दिसून येत आहेत.
 
याच अनुषंगाने अष्टविनायक हॉल येथे पार पडलेल्या व्यापक बैठकीत आदोलानाची पुढील दिशा ठरविण्यात आली. केवळ घोषणा होईपर्यंत नव्हे तर ठोस कारवाई होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. यासोबत  महानगरपालिकेच्या वतीने उजनीचे पाणी मिळविण्यासाठी ठराव घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकरांनी शक्य त्या मार्गाने केंद्र शासन व राज्य शासना पर्यंत आपली मागणी नोंदवून सकारात्मक दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments