rashifal-2026

राजदंड पळवला, महापौरांना बांगड्या आणि साडीचोळीचा आहेर

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (11:03 IST)
नगरोत्थान, दलित वस्ती सुधार आणि जिल्हा नियोजनकडून आलेला निधी याचे असमान वाटप झाल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. निधीत भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विक्रांत गोजमगुंडे यांनी केला. यावरुन प्रचंड गदारोळ उठला. महिला नगरसेविकांनी महापौरांना बांगड्या आणि साडी-चोळीचा आहेर दिला. या सबंध प्रकारामुळं सर्वसाधारण सभा तासाभरासाठी तहकूब करण्यात आली. पुन्हाही गोंधळ चालूच राहिला. नगरसेवक युनूस मोमीन यांनी राजदंड पळवला. तो त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी मोठी झटापट करावी लागली. निधी वाटपात महापौरांनी पक्षपात केला यावर कॉंग्रेस सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. दीपक सूळ, युनूस मोमीन, विक्रांत गोजमगुंडे, अहमदखां पठाण, रवीशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, सपना किसवे आणि उषा कांबळे यांनी महापौरांच्या डायससमोर ठिय्या मांडला. एक नगरसेवक तर चक्क महापौरांच्या टेबलावरच जाऊन बसले होते. या गोंधळातच महापौरांनी सगळे विषय मंजूर झाल्याचे घोषित करुन टाकले. दुपारी तीन वाजता सुरु झालेली सभा रात्री अकरापर्यंत चालली. गोंधळ आणि विलंबामुळे अनेक नगरसेवक मधेच निघून गेले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: बीएमसीच्या पराभवानंतर भाई जगताप यांची वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या कारचा अपघातात 5 जण ठार

बीएमसीच्या पराभवानंतर भाई जगताप यांची वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई,61 कोटी रुपयांचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त

बीडमध्ये एमपीएससी टॉपर सचिन जाधवचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की खून ?

पुढील लेख
Show comments