Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Washim :महाराष्ट्राचे सुपुत्र जवान आकाश आढागळे यांना लडाखच्या लेह मध्ये वीर मरण

Webdunia
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (16:03 IST)
Washim :महाराष्ट्राचे वाशिमचे शिरपूर गावाचे सुपुत्र भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेल्या जवान आकाश आढागळे यांना लडाखच्या लेहमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले. 
 
आकाश यांना लेहमध्ये कर्तव्य बजावत असताना 8 सप्टेंबर रोजी एका अपघातात गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीनं सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना त्यांनी रविवारी 10 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. अपघातात ते गंभीर जखमी  झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले. 

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे मोठे भाऊ नितीन हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे तर धाकटा भाऊ उमेश हे महाराष्ट्रात सुरक्षाबलात कार्यरत आहे. आढागळे यांच्या कुटुंबातील तिन्ही मुले देशसेवेसाठी कार्यरत आहे. आकाश यांनी 2011 मध्ये इंडियन आर्मीत प्रवेश घेतला होता. 
 
त्यांच्या निधनाने आढागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांचे पार्थिव मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी त्यांच्या गावी शिरपूर येथे आणणार असून तिथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. 
 



Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

चेंबूर मध्ये आगीत एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

IND vs BAN 1st T20i:भारताच्या सर्वात वेगवान गोलंदाजासह 3 खेळाडू आज पदार्पण करतील! दोन्ही संघाचे प्लेइंग-11 जाणून घ्या

Israel-Lebanon: इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्याने बेरूत हादरले

IND W vs PAK W : भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यासाठी पुनरागमन करेल

Israel-Hezbollah War: इस्त्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये आतापर्यंत 1,974 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments