Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Russia - Ukraine war:रशियन सैनिक करत आहेत महिलांवर बलात्कार... युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे गंभीर आरोप

Webdunia
शुक्रवार, 4 मार्च 2022 (23:24 IST)
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी शुक्रवारी रशियन सैनिकांवर महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला. युक्रेनच्या भूमीवर रशियन सैनिक क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत, असे ते म्हणाले. रशियाच्या आक्रमकतेला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी केली.
 
आज रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमधील युद्धाचा नववा दिवस आहे. रशियन सैनिकांच्या अथक हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये खळबळ माजली आहे. लाखो युक्रेनियन शेजारील देशांमध्ये आश्रय घेत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी या युद्धाला मोठे मानवतावादी संकट म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी लंडनच्या चथम हाऊस थिंक-टँकमध्ये एका ब्रीफिंगमध्ये सांगितले की, "दुर्दैवाने, आमच्याकडे अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये रशियन सैनिकांनी युक्रेनियन शहरांमध्ये महिलांवर बलात्कार केला आहे." हे खूप धक्कादायक आहे.
 
दिमित्रो यांनी या प्रकरणात फारसे काही सांगितले नसले तरी, त्यांनी या प्रकरणातील विशेष न्यायाधिकरणाकडे यूके आणि आंतरराष्ट्रीय कायदा तज्ञांच्या एका गटाने केलेल्या अपीलचे समर्थन केले. ते थांबवण्याचा एकमेव मार्ग आंतरराष्ट्रीय कायदा आहे. या युद्धाला जबाबदार असलेल्या लोकांना नक्कीच धडा मिळेल. 
 
कुलेबा म्हणाले की, आपण आपल्यापेक्षा जास्त ताकदवान शत्रूशी लढत आहोत. परंतु आंतरराष्ट्रीय कायदा आमच्या बाजूने आहे आणि आशा आहे की ते आम्हाला जिंकण्यात मदत करेल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments